Ad will apear here
Next
प्राप्तिकर परतावा मिळणार अवघ्या एक दिवसात

नवी दिल्ली : ‘प्राप्तिकर विवरणपत्राची छाननी अवघ्या एक दिवसात करणाऱ्या एकात्मिक ‘ई-फायलिंग’ आणि केंद्रीकृत प्रक्रिया केंद्राची उभारणी करण्यात येत असून, हे केंद्र कार्यान्वित झाल्यानंतर प्राप्तिकर परतावा अवघ्या एक दिवसात मिळू शकणार आहे,’ अशी माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी नुकतीच पत्रकार परिषदेत दिली. 

केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल
‘सध्याचे प्राप्तिकर ई-फायलिंग पोर्टल व केंद्रीकृत प्रोसेसिंग केंद्र यांना एकत्र करून हे नवे प्रक्रिया केंद्र निर्माण करण्यात येत असून, याच्या निर्मितीला केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी, १६ जानेवारी २०१९ रोजी मंजुरी दिली. यासाठी चार हजार २४१ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली असून, ही नवी सुविधा निर्माण करण्यासाठी १८ महिने लागतील. आणखी तीन महिन्यांच्या चाचणीनंतर ते सुरू होईल. यामुळे प्राप्तिकर संकलन आणि कर परताव्याचे काम सुलभ आणि जलदगतीने होईल. या २१ महिन्यांच्या कालावधीनंतर प्राप्तिकर परतावा अवघ्या एक दिवसात मिळू शकेल,’ असे गोयल यांनी स्पष्ट केले. 

‘सध्या प्राप्तिकर विवरणपत्रांची छाननी करण्यासाठी ६३ दिवस लागतात. ती प्रक्रिया एका दिवसावर येणार असून, विवरणपत्र अचूक दाखल केले असल्यास लगेच कर परतावा मिळणे शक्य होईल. विवरणपत्रातील चुकांची दुरुस्ती करण्याची प्रक्रियादेखील आणखी सुलभ आणि झटपट होईल’, असा विश्वास गोयल यांनी व्यक्त केला. 

‘सध्या केवळ ०.३ टक्के प्राप्तिकर विवरण पत्रांचीच छाननी होत असून, आमच्या सरकारचा करदात्यांवर पूर्ण विश्वास आहे. सध्याच्या प्राप्तिकर ई-फायलिंग पोर्टल व केंद्रीकृत प्रक्रिया केंद्राच्या माध्यमातून आतापर्यंत २३ कोटी विवरणपत्रे दाखल झाली असून, दोन लाख ६१ हजार ८०८ कोटींचे परतावे ३० सप्टेंबर २०१८पर्यंत देण्यात आले आहेत. एप्रिल ते सप्टेंबर २०१८ दरम्यान पहिल्या सहा महिन्यांत एक कोटी ८३ लाख रुपयांचा कर परतावा केंद्रीकृत प्रक्रियेद्वारे थेट जमा झाला आहे. नोकरशाही आणि नेहमीचे इतर अडथळे न आल्याने या वर्षी मोठ्या प्रमाणावर कर परतावे पोहोचले आहेत. डिजिटल माध्यमांचा वापर करणाऱ्यांना आणखी सुविधा मिळतील,’ असेही गोयल यांनी नमूद केले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/WZOWBW
Similar Posts
प्रत्यक्ष कर संकलनात दहा वर्षांतील विक्रमी वाढ नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने साधारणत: दोन वर्षांपूर्वी घेतलेल्या नोटाबंदीच्या ऐतिहासिक निर्णयावर विविध स्तरांतून जोरदार टीका झाली असली, तरी त्यामुळे प्रत्यक्ष कर भरण्यात विक्रमी वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. नोटाबंदीनंतर वैयक्तिक करदात्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून, प्रत्यक्ष
उद्योगांना अर्थसहाय्य वाढवण्याची गोयल यांची बँकांना सूचना नवी दिल्ली : सार्वजनिक बँकांनी लघु, मध्यम उद्योगांना कर्ज वितरण वाढवावे, अशी सूचना हंगामी केंद्रीय अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी केली आहे.वित्त विभागाचे सचिव राजीव कुमार यांनी आयोजित केलेल्या सार्वजनिक बँकांच्या प्रमुखांच्या बैठकीत ते बोलत होते.
दहा सरकारी बँकांचे चार बँकांमध्ये विलिनीकरण होणार नवी दिल्ली : देशातील दहा सरकारी बँकांचे चार बँकांमध्ये विलिनीकरण करण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी (३० ऑगस्ट २०१९) नवी दिल्लीत केली. त्यामुळे सरकारी बँकांची संख्या २७वरून १२ होणार आहे. विलिनीकरणानंतर बँक कर्मचाऱ्यांची कोणतीही कपात केली जाणार नाही, असेही सीतारामन यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले
मधुबनी चित्रांनी सजणार जपानी रेल्वेगाड्या नवी दिल्ली : लवकरच जपानमधील रेल्वेगाड्या भारतीय मधुबनी (मिथिला) चित्रशैलीतील चित्रांनी सजलेल्या दिसल्या, तर आश्चर्य वाटून घेण्याचे कारण नाही. कारण या मधुबनी चित्रांच्या सौंदर्याची भुरळ जपानलाही पडली आहे. भारतीय रेल्वेप्रमाणे आपल्या रेल्वेगाड्याही मधुबनी चित्रांनी सजवण्याचा निर्णय जपानने घेतला आहे. त्यासाठी

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language